तुको बादशहा


तुको बादशहा,
देई शब्ददान
करी धनवान
लेखणीला.

अगा शब्दराजा,
होई कृपावंत
ओत आशयात
पंचप्राण.

नामयाने तुज
सांगितले गुज
पेर तेच बीज
अप्रतिम.

परम अर्थाची
पायाखाली वीट
बसवावी नीट
घडवोनी.

श्लील - अश्लीलाचा
करी तू निवाडा
भाषेच्या कवाडा
उघडोनी.

No comments:

Post a Comment