Showing posts with label समाधीच्या बड्या बाता. Show all posts
Showing posts with label समाधीच्या बड्या बाता. Show all posts

समाधीच्या बड्या बाता

समाधीच्या बड्या बाता,
सांगू नको भगवंता.

मोक्ष, मुक्ती - आश्वासन:
लबाडाचे आवतण.

उगा पाडू नको कीस
प्राण झाला कासावीस.

भुकेसाठी चतकोर
असो शिळा वेळेवर.

वाळवंटी जिता झरा
लाव एक तरी खरा.

नाहीतर झटपट
सोड भिवरेचा तट !