समाधीच्या बड्या बाता

समाधीच्या बड्या बाता,
सांगू नको भगवंता.

मोक्ष, मुक्ती - आश्वासन:
लबाडाचे आवतण.

उगा पाडू नको कीस
प्राण झाला कासावीस.

भुकेसाठी चतकोर
असो शिळा वेळेवर.

वाळवंटी जिता झरा
लाव एक तरी खरा.

नाहीतर झटपट
सोड भिवरेचा तट !

No comments:

Post a Comment