कवितेचा देव
तूच एक तुक्या
बाकी सार्या नख्ख्या
कापसात.
तूच एक राजा,
नगदीचे पीक
बाकी झिकझिक
उधारीची.
तूच कलदार
रोकडीचा दाम
बाकी जोडकाम
कुसरीचे.
तूच केले दूर
डोळ्यांचे पडळ
अंतरीची कळ
कळो आली
बोले तुकाराम
तोच आत्माराम
अभंगाचा.
यमकाला शक्ति
देई नामदेव
प्रतिमेचा भाव
पायरीला.
अर्थसमाधीत
नांदे ज्ञानेश्वर
माखवी अक्षर
अमृताने.
बोले तुकाराम
तोच आत्माराम
अभंगाचा.
यमकाला शक्ति
देई नामदेव
प्रतिमेचा भाव
पायरीला.
अर्थसमाधीत
नांदे ज्ञानेश्वर
माखवी अक्षर
अमृताने.
तूच एक तुक्या
बाकी सार्या नख्ख्या
कापसात.
तूच एक राजा,
नगदीचे पीक
बाकी झिकझिक
उधारीची.
तूच कलदार
रोकडीचा दाम
बाकी जोडकाम
कुसरीचे.
तूच केले दूर
डोळ्यांचे पडळ
अंतरीची कळ
कळो आली
बोले तुकाराम
तोच आत्माराम
अभंगाचा.
यमकाला शक्ति
देई नामदेव
प्रतिमेचा भाव
पायरीला.
अर्थसमाधीत
नांदे ज्ञानेश्वर
माखवी अक्षर
अमृताने.
बोले तुकाराम
तोच आत्माराम
अभंगाचा.
यमकाला शक्ति
देई नामदेव
प्रतिमेचा भाव
पायरीला.
अर्थसमाधीत
नांदे ज्ञानेश्वर
माखवी अक्षर
अमृताने.
No comments:
Post a Comment