पाचोळ्याच्या धनी

पाचोळ्याच्या धनी
झाल्या वंशवेली
सुखाची सावली
भासमती.

भास आणि भ्रम
चकव्याचे भाऊ
खाती लाऊ लाऊ
उभा जन्म.

उभे घर माझे
करती आडवे
नांगर गाढवे
फिरविती.

No comments:

Post a Comment