काय करू मला
धरले तुक्याने
जगणे सुखाने
आटोपले.
तुकाराम श्वास,
तुकाराम ध्यास
सदा आसपास
तुकाराम.
काव्याच्या पापाचे
भोगतो मी फळ
तुकाराम छळ
करी माझा.
करू तरी काय
सांगा प्रायश्चित
दुभंगले चित्त
सांधू कसे ?
- म्हणे घालविले
बेचाळीस वाया
अखेरीस पाया
सापडला.
बांध ऐपतीने
चिरेबंदी वाडा
हुड्यावर हुडा
चढवावा.
उशिरा पटली
मातीची ओळख
घेई आता पीक
मनाजोगे.
शब्दांपाशी ठेव
जीव तू गहाण
तुला माझी आण
म्हणे तुका.
धरले तुक्याने
जगणे सुखाने
आटोपले.
तुकाराम श्वास,
तुकाराम ध्यास
सदा आसपास
तुकाराम.
काव्याच्या पापाचे
भोगतो मी फळ
तुकाराम छळ
करी माझा.
करू तरी काय
सांगा प्रायश्चित
दुभंगले चित्त
सांधू कसे ?
- म्हणे घालविले
बेचाळीस वाया
अखेरीस पाया
सापडला.
बांध ऐपतीने
चिरेबंदी वाडा
हुड्यावर हुडा
चढवावा.
उशिरा पटली
मातीची ओळख
घेई आता पीक
मनाजोगे.
शब्दांपाशी ठेव
जीव तू गहाण
तुला माझी आण
म्हणे तुका.
No comments:
Post a Comment