मिळाला अखेर

मिळाला अखेर
हक्काचा आसरा
तुकोबा सोयरा
झाला माझा.

दाखवील तोच
मला माझी वाट
खुशाल, धोपट
नाही फेरा.

घाली तोच मला 
विठोबाचे पायी
शुद्घ ठायी ठायी
करोनिया.

असे जीवलग
माझा प्राणसखा
मैतर तो तुका 
एकमेव.

No comments:

Post a Comment