फटकळापाशी

फटकळापाशी 
जाई फटकळ
बोलणे सकळ
तोंडफोड.

वाण नाही पण 
लागलासे गुण
संतसंगतीनं
तुकोबाच्या.

जळो, तुटो देवा
अशी माझी जीभ
काय तिचा लाभ ? 
जगवैरी.

तुझी नाममुद्रा
ठेव तिच्यावर
तेंव्हा ताळ्यावर
येईल ती.

No comments:

Post a Comment