खेटुनिया उभे

खेटुनिया उभे
मला माझे सुख
भेटण्या उत्सुक
उराउरी.

त्याच्या माझ्यामध्ये
एक अडसर
ज्यात कणभर
माझे - तुझे.

घडे चुकामुक,
होय ताटातुट
उरली झंझट
वाट पाही.

No comments:

Post a Comment