आम्ही असे जुने पापी

आम्ही असे जुने पापी
संत सारे घालू खापी.

जाती-जातीमधे वाटू
कुलनामे पुण्य लाटू.

नाही अधिकार तरी 
भाष्य करू भरजरी.

चिकटवू थोर थोर,
नवनवे चमत्कार.

कोणी चालवितो भिंत,
कोणी बसे विमानात.

याचे त्याचे स्थापू मठ
भरू पिढ्या-पिढ्या पोट !

No comments:

Post a Comment