तुला पुरे फक्त वास

तुला पुरे फक्त वास
मला कमी पडे घास.

तुझे वार्‍याचे धावणे
माझ्या पायात लोढणे.

तुझा विदेहाचा खेळ
मला वासनेचा चळ.

तुला दगडाचे बळ
माझे मातीचे कपाळ.

तुला शाश्वताची चाड
माझी कुजणारी हाडं.

तुला म्हणताना बाप - 
माझी माय करी पाप !

No comments:

Post a Comment