तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
वाळूक असते
वाळूक असते
चिरोनिया त्याला
दाखवितो तुला
मन माझे.
कोणत्या उपाये
दाखवू मी तुला ?
भाव मनातला
माझ्या देवा.
व्यापिलेस जर
तूच स्थिरचर
मन का बाहेर
आहे त्याच्या ?
तुझ्याच घरचा
तुजला वृत्तांत
सांगू मी त्रयस्थ
कसा काय ?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment