तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
लंगड्याने कशी
लंगड्याने कशी
गाठावी पंढरी ?
हाग्याची गोदरी
दूर ज्याला.
चोरलेस देवा
तूच माझे पाय
सांगतोस काय
नाचण्याला.
खुंटविण्या माझी
बाहेरची धाव
चांगला उपाव
काढला तू.
धाव तूच आता
घेण्या माझी भेट
सोड सोड वीट
तातडीने !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment