ग्रंथाहून थोर

ग्रंथाहून थोर
एक अनुभव
कळे त्याची चव
घेतल्याने.

सांगोवांगी नाही,
नाही लिखापढी
आतल्या आतडी
झोंबाझोंबी.

ज्याची त्याला पुरे
शिदोरी ना उरे
बायको ना पोरे
वारस त्या.

No comments:

Post a Comment