नाही अधिकोषी ठेव

नाही अधिकोषी ठेव
बंद तिजोरीत देव.

रेखांकित धनादेश
तसा नाही परमेश.

नाही वचनाची चिठ्ठी,
नाही हुंडी भली मोठी.

नाही उद्याचा वायदा,
नाही उधार फायदा.

नाही फाटलेली नोट,
माल घेऊ जाता खोट.

कलदार खण्णकन्‌
त्याची नगदीची खूण.

No comments:

Post a Comment