भूक लागता जेवतो

भूक लागता जेवतो
झोप येता झोपी जातो.

देहधर्म ना रोकतो
खाज येता खाजवतो.

राग येता शिव्या देतो
प्रेम स्फुरे आलिंगतो.

वेडीवाकडी साधना
गोड करी नारायणा. 

No comments:

Post a Comment