सुरकुतलेले अंग

सुरकुतलेले अंग,
डोळ्यावर जाड भिंग.

मुखी नकली कवळी
पंचपक्वान्ना आवडी.

जपे ऐकण्याचा मंत्र
कानी बसवले यंत्र.

चाले आधाराच्यासाठी
हाती वागवत काठी.

त्यासी काय सांगे गीता ? 
सारी हारमोर होता. 

No comments:

Post a Comment