धीर धर

धीर धर
माझ्या मना
वेडेपणा
सोड बा.

पुत्रमुख
पाहण्यास
कळा सोस
प्रसुती.

पिकलेले
गळे फळ
काळवेळ
भरता.

वेळे आधी
तसे काही
होणे नाही
कदापी.

No comments:

Post a Comment