तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
काकडी - दोडका
काकडी - दोडका
लागे वेलीवर
तसे का लेकरं
लागतील ?
नभातून पडे
धरणी झेलेल
लेकरू होईल
काय असे ?
मायमावलीने
वागविला भार,
नऊ मास थोर
ओटीपोटी.
जन्मला महंत
बोलतो विचित्र
म्हणे अपवित्र
नारीजात.
शाळुंका नि लिंग
एकापिंडी स्थित
कल्पी त्यात द्बैत
संशयात्मा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment