तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
आंगभर झाली
आंगभर झाली
आलो रडकुंडी
कोठे कोठे धुंडी
घेऊ तुझी.
दुनियेच्या जत्री
हारपली माय
पोरक्याचे पाय
पांगुळले.
ठायी ठायी दिसे
उभी पाठमोरी
वळता माघारी
भलतीच.
जाऊ तरी कोठे
पाहू तरी कसा
झालो वेडापिसा
पुरता मी.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment