तहानेचे हेच फळ

तहानेचे हेच फळ - 
उरफुटी धावफळ.

घरदार, सोनेनाणे:
तारुण्याला वटवणे.

रुचे भरल्या पोटाला
पद-प्रतिष्ठेचा काला.

सारे करून भागलाई
पाठी देवाच्या लागला.

मढ्यासाठी कोण रडे ?
नाही पुरेसे गाठोडे !

No comments:

Post a Comment