माझ्यापाशी नाही
माझा घरधनी
करू वेणीफणी
कशासाठी ?
झाले नाही डोळा
मुखाचे दर्शन
काजळाचं लेणं
कशासाठी ?
त्याच्याविन सुनी
शेज लागे झुरू
हिर्वा चुडा भरू
कशासाठी ?
हारपला माझ्या
जीवाचा ताईत
गळा काळी पोथ
कशासाठी ?
कशासाठी लावू
कपाळाला कुंकू ?
त्याचे नाव राखू
कशासाठी ?
No comments:
Post a Comment