तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
क्रोधाचे तेजाब
क्रोधाचे तेजाब
जाळी अंतरंगा
धाव पांडुरंगा
शांतविण्या.
मायबापासंगे
वारले माहेर
उरले सासर
धनलोभी.
फुटेल गोट्याला
एकवेळ घाम
व्यवहारी प्रेम
पाझरेना.
विकुनी खावया
आले गणगोत
माझी तू किंमत
मोज देवा !
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment