सुचू देत नाही

सुचू देत नाही
आकड्यांचा खेळ
कसा रोजमेळ
जुळवावा ?

सात खाऊनिया
पाचाची ती भूक,
वासुनिया मुख
कायमची.

मनाचा कागद,
आकांक्षांची शाई
उण्यावर घाई
बेरजेची.

भागवोनी जिणे
केले गुणाकार
राखेत अखेर
उरे शून्य.

No comments:

Post a Comment