तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
बाभळीच्या झाडा
बाभळीच्या झाडा
लागती ना आंबे
साधेल का दंभे
साधुपण ?
निंबोळीच्या पोटी
फळेल का गोडी ?
वेसवेला थोडी
लाज वाटे ?
धोतर्याचे बीज
उगवे जहर
तेथे मातीवर
काय दोष ?
जोवरी ना मन
अवघे निर्मळ
तुझा तूच खळ
एकमेव.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment