पालटण्या हवा

पालटण्या हवा
गेलो देशोदेशी
मनाची उदासी 
नाही गेली.

पालटल्या नाही
डोक्यातल्या चिंता
मनातला गुंता
आहे तसा.

पायाचा अंगठा
झाला जायबंदी
कपाळाला चिंधी
काय कामा ?

शिणविले पाय
पृथ्वी पर्यटना
अंतरल्या खुणा
अंतरीच्या.

No comments:

Post a Comment