तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
उंटाच्या फेंडीचा
उंटाच्या फेंडीचा
घेऊ पाहे मुका
नाही त्याच्या दु:खा
पारावर.
कोकिळेचा गळा
खाई शिजवून
काय कंठी गाणं
येई त्याच्या ?
कोणाच्या हातात
कधी रे लागली,
स्वत:ची सावली
सांग बापा ?
करू नको मना
कोणाचा हिरस
दु:खाचा वारस
होऊ नको.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment