तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
वाटतो साधावा
वाटतो साधावा
मला परमार्थ
सांडवेना स्वार्थ
रक्तातला.
व्हावे कसे पुरे
माझे पतीव्रत ?
सोबतीला लत
छिनालीची.
उरला न काही
आपपर भाव,
अशी माझी हाव
बळावली.
केल्या लटपटी
रांडापोरांसाठी
प्राणाचे शेवटी
तेच वैरी.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment