तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
बायकोपरीस
बायकोपरीस
शेजारीण बरी
तशी झाली परी
संसाराची.
मिळाले ते वाटे
कवडी मोलाचे
वाटे दुर्लभाचे
लाखमोल.
हातचे सोडून
पळत्याच्या मागे
मन धावू लागे
आवरेना.
भेटल्या होशील
तूही तृणवत,
म्हणूनी अप्राप्त
भला देवा.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment