तोडुनिया टाळे

तोडुनिया टाळे
धाव घे बाहेर
लागली अंगार
चोखोबाला.

मोडुनी चौकट
मुक्त होई देवा
वाचवा वाचवा
चोखोबाला.

तसबिरीतली
फोड काचबंदी
दिली नामी संधी 
चोखोबाने.

चोखोबाच्या मिसे
सोड रे गाभारा
करी तू पोबारा
कैदेतून.

No comments:

Post a Comment