तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
तुमचेच गहू
तुमचेच गहू,
तुम्हा मेजवानी
आम्ही सुगरणी
प्रकाराच्या.
तुमच्या आवडी
तुमचे भोजन
निमित्ता कारण
चूल-भांडी.
जिंकण्या हृदय
वाट पोटातून
अंगचीच जाण
रंधावना.
ऐकण्या ढेकर
अधीरले कान
पंचपकवान
आतुरले.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment