मीच माझा देश

मीच माझा देश,
मीच माझा धर्म
वेद - गीता - वर्म
ठावे मज.

मला विचारून
उगवतो सूर्य
चुकण्याचे धैर्य
नाही त्याला.

माझ्याहून मोठा
नाही माझा बाप
त्याची काय टाप
माझ्यापुढे !

माझ्याहून थोर
फक्त माझी कांता
चालविते सत्ता
पापणीने.


No comments:

Post a Comment