हालत्या खोपटा

हालत्या खोपटा
सावरून धर
द्यावया आधार
ठुनी व्हावे.

रोज न्यारी न्यारी
सुटे वावटळ
सोसण्या दे बळ
त्याच्या कुडा.

मागीतली कधी 
सोन्याची कऊले ?
पावसा पहिले
फेर जुनी.

फडफडे आत
चिमणीची ज्योत
धर दोन्ही हात
आडोशाला.

No comments:

Post a Comment