साहेबाच्या लाथा

साहेबाच्या लाथा
मानाव्यात गोड
आले जरी फोड
ढुंगणाला.

साहेबाची थुंकी
झेलावी चाटावी
आणिक वाटावी
सेवाभावे.

हासत ऐकाव्या
साहेबाच्या शिव्या
कानावर ओव्या
अमृताच्या.

कौतुकावे सदा
साहेबाचे छंद
थोर लंदफंद
चघळावे.

बायकोला मूल-
श्रेय साहेबाला
वहावे देवाला 
फुलापरी.

No comments:

Post a Comment