तुझ्या वाटेवर

तुझ्या वाटेवर 
जीव मी जाळीन
आणि चेतवीन
दीपमाळ.

तनामनातून
झिरपो प्रकाश
उजळो आकाश
अंतराचे.

लाख पावलांनी
येऊ दे अंधार
समर्थ आधार
पणतीचा.

No comments:

Post a Comment