वारियाला काय

वारियाला काय
मारशील लाथा
फोडशील माथा
मोक्षावर.

उरातली आग
लाऊनिया घरा
राखेचा अंगारा
फासशील.

करीसी पातळ
पाण्याहून माया
लेकुरे नि बया
सांडशील.

आकाश ठेंगणे
अहंकाराहून
ज्ञानाचाही खून
पाडशील.

No comments:

Post a Comment