बंदा टोचलेला कान

बंदा टोचलेला कान
ऐकी अजानाची तान.

तळलेल्या पापडानं
केलं चुरा बालपण.

बुरख्याच्या जाळीमागे
ओले पदराचे धागे.

एकादशी - रमजान:
बुडे निर्जलात प्राण.

No comments:

Post a Comment