तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
अपमान झाला
अपमान झाला !
अपमान झाला !
बोंबलत आला
रागावून.
याच्या - त्याच्यासाठी
काय नाही केले ?
नाही विचारले
चहापाणी.
वेळेवर ज्याची
नड भागवली
त्याने नाकारली
ओळखही.
अवघ्याचे आहे
एक दु:खमूळ:
अपेक्षिता फळ
चुके वर्म.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment