तुको बादशहा : श्रीकृष्ण राऊत
मुकण्या हत्तीचे
मुकण्या हत्तीचे
जुगणे निष्फळ
तैसाचि उथळ
भक्तिभाव.
खडकावरती
उगवे ना बीज
येईल का नीज
काट्यांवर ?
घातल्या पाण्याची
वाहील का गंगा ?
कळ ये न अंगा
उसण्याची.
मायच्या दुधाची
येत नाही सर
माया वरवर
मावशीची.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment