होऊनिया पंच

होऊनिया पंच
बाहेर निवाडा
घरचा झगडा
सोडवेना.

बाहेर देतो मी
मिशांवर ताव
घरी साधी डाव
भलताच.

आपली ती पाठ 
आपल्या लोचना
तसाच दिसेना
आत्मदोष.

मागे पुढे होई
विठ्ठला आरसा
दावी आहे तसा
माझा मला.

No comments:

Post a Comment