धरी मजवरी

धरी मजवरी
प्रेमाची पाखर,
घेई वो सत्वर
पोटापाशी.

मारता भरारी
आकाश थोकडे
ऐसे दे रोकडे
पंखबळ.

तुझिया नामाची
करी चिवचिव,
जीवातला जीव
विठ्ठले वो.

No comments:

Post a Comment