असा संसाराचा दंड

असा संसाराचा दंड - 
थंड करी सारे बंड.

काय सांगू त्याची गत
करी जितेपणी खत.

असा तापे त्याचा ताप - 
करी जीवनाची वाफ.

केला केला त्याने घात
नेला प्राण हातोहात.

No comments:

Post a Comment