मिळे बदलून

मिळे बदलून
फाटलेली नोट
माणसाची खोट
निरुपाय.

आवडले नाही
माय, बाप, भाऊ
टाकण्या ते जाऊ
सांगा कोठे ?

मारक्या  ढोराला
दाखवू बाजार
पोटचे ते पोर
करू काय ?

त्रिखंडात नाही 
स्वभावाला दवा
सप्रेम वागवा
लागे तया.

No comments:

Post a Comment