भरल्या घरात

भरल्या घरात
शोधिले सर्वत्र
मंगलाचे सूत्र
सापडेना.

मुख मी दाखवू
कसे भ्रताराला ?
लागला जीवाला
बाई घोर.

किती वेळा सये
करू घरदार ?
वाया येरझार
शिणवते.

जाऊ तरी कोठे ?
पाहू तरी कशी ?
लागेल वो फाशी
रित्या गळा.

No comments:

Post a Comment