कंचीतले फूल

कंचीतले फूल
 काढण्यास गेलो -
फोडुनी पावलो
दोन भांगा.

उरली ना कंची
खेळण्याच्या कामा
बनविले मामा
फुलानेही.

तैसे झाले माझे 
नासला संसार
लागला ना थार
देवा तुझा.

No comments:

Post a Comment