वेटोळी घालून

वेटोळी घालून
उशाखाली नाग,
तसा तुझा संग
झाला मज.

रातही जाईना,
झोपही येईना
चैनही पडेना
पळभर.

सोड माझा पिच्छा,
तोड हे अंतर
दंश तरी कर
एकदाचा!

No comments:

Post a Comment