धनाच्या लोभाने

धनाच्या लोभाने
बळी द्यावे मूल
तसे ब्लॅकमेल
करू नको.

आपला म्हणोनी
सांगितले गूज
तुला फार खाज
बोभाट्याची.

कसारे तू गड्या,
अंतरंग-मित्र ?
मैत्र अपवित्र
करू जासी.

आहे तशी ठेव
झाकलेली मूठ
आणि एकजूट
तुझी-माझी.

No comments:

Post a Comment