स्वस्तात चविष्ट

स्वस्तात चविष्ट 
आयात तंगडी
स्वदेशी कोंबडी
हुंगे कोण ? 

कित्ती कित्ती घट्ट 
परेदशी दूध
पिता गेली शुद्घ 
गोपाळाची.

चार चाकी असो, 
असो दोन चाकी
वापरोनी फेकी 
समुद्रात.

विदेशी विजेने 
असा दिला धक्का - 
माजे तहलका 
बुडाखाली.

मिळाली बुद्घाला 
हासण्याची शिक्षा
शिल्पालागी दीक्षा 
विद्रुपाची.

न्यानबा - तुक्याची 
सुकी इंद्रायणी
मागे गार पाणी 
मिनरल.

टिको पांडुरंगा 
तुझे देशीपण
भजनांची धून 
झाली पॉप.


No comments:

Post a Comment