वेश्येच्या रक्तात

वेश्येच्या रक्तात
आढळो ना एडस्‌
ऐसी दे गर्भास
गुणसूत्रे.

मेंदुला कवटी,
बुबुळाला खाच 
तैसे दे कवच
त्याच्या मना.

अखंड आसूड
ओढणारे भ्रष्ट
सोसण्या दे पाठ
कासवाची.

उलटे काळीज,
पालथी आतडी
गेंड्याची कातडी
स्वयंसिद्घ.

ठेव दातावर
अभिनयी हसू
ग्लिसरीन आसू
पापण्यात.

घाल गर्भवासी
फक्त पुत्ररत्न
पितरांचे ऋण
फेडावया. 

No comments:

Post a Comment