ओळखला नाही

ओळखला नाही
जीवीचा जिव्हाळा
लोभे त्याच्या गळा
दिले नख.

आपुलकीमध्ये
कालवली माती
मायावंत नाती
वटवली.

अंथरूनी नोटा
निजलो त्यावर
स्पर्श ऊबदार
अंतरले.

नासवले प्रेम,
जळो व्यवहार
नेले मढ्यावर
संगे काय ?

No comments:

Post a Comment